धुळे

धुळे पोलिसांनी रोखली गुंगीकारक औषधांची तस्करी; ५८० बाटल्या, गोळ्या केल्या हस्तगत

एलसीबी पथकाने केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधाचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चार जणांकडून गुंगीकारक औषधाच्या सुमारे ५८० बाटल्या व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या पाच हजाराहुन जास्तीच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या ललित पाटील ड्रग्स प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत असताना धुळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या व गुंगीकारक औषधांचा […]

छ. संभाजीनगर

परीक्षेत मोबाइल समोर ठेवून करा बिनधास्त कॉपी; परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मोबाइल समोर ठेवूनच कॉपी करण्यात येत असल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या कॉपीचे व्हिडीओसह चित्रण करीत परीक्षार्थींचे मोबाइल जप्त करणाऱ्या सहकेंद्रप्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकले. हे कुलगुरूंना समजताच त्यांनी परीक्षा संचालकांची कानउघाडणी करीत परीक्षेसाठी बैठे पथक नेमण्याचे आदेश दिले. या घटनेची चौकशी करण्यासाठी सहकेंद्रप्रमुखासह […]

Satara

महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी

 वातावरणातील बदलामुळे थंडीत वाढ झाली असून सातारा शहराचा पारा शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी १३ अंशाजवळ होता. जागतिक पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्येही कुल-कुल वातावरण आहे. पर्यटक थंडीचा आनंद लुटत आहेत. मात्र, गतवर्षीपेक्षा महाबळेश्वरला थंडी कमीच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात यावर्षी दीड महिना उशिराने कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. नेहमी नोव्हेंबरपासून गुलाबी थंडीची […]

solapur

केंद्रीय पथक करमाळ्यात; दुष्काळ गावांची पाहणी सुरू

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने गुरुवारी करमाळा तालुक्यातील मलवडी, घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांकडून बाधित पिकांची माहिती घेतली. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर असून बुधवारी, १३ डिसेंबर रोजी पथक सोलापुरात दाखल झाले. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही दुष्काळ गावांची तपासणी पथकाकडून सुरू आहे. केंद्रीय पथकाकडून […]

कोल्हापुर

कोल्हापुरातील आंदोलनाचा ४८ वा दिवस, सरकारविरोधात घोषणाबाजी

 मराठा आरक्षण मिळेपर्यंत या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे चार संघटनांनी शनिवारी दसरा चौकात जाहीर केले. सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत सकल मराठा समाजाने साखळी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचा शनिवारी ४८ वा दिवस होता. दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या धरणे आंदोलनाला काेल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघ, सीपीआरमधील डी.एम. […]

पुणे

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची २७ डिसेंबरपासून महाअंतिम फेरी

महाराष्ट्रातील संगीत नाटकांची बीजे आंध्र प्रदेशात सुरभि थिएटरच्या माध्यमातून रुजविणाऱ्या वनारसे कुटुंबातील कलावंत तब्बल १२० वर्षांनंतर पुण्यात येत आहेत. संगीत नाटकासह हौशी, व्यावसायिक रंगभूमीवरील कलावंत, दिग्दर्शकांशी संवाद साधणार आहेत. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी २७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या निमित्ताने वनारसे कुटुंबीयातील कलावंत अजयकुमार वनारसे कलावंतांशी संवाद साधणार आहेत. वनारसे कुटुंबीय मूळचे महाराष्ट्रीयन. अलिबाग […]