गुन्हा मुंबई

रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी तीन जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात

 रिझर्व्ह बँक (Reserve Bank OF India) धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे. तिघांनाही गुजरातमधील बडोद्यातून ताब्यात घेतलं आहे.  खिलाफत इंडिया या नावाने रिझर्व्ह बँकेला ईमेल आला होता. संशयित आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. खिलाफत इंडिया या ई-मेलवरून धमकी आली होती. या  ईमेलमुळे मोठी खळबळ उडाली होती.  मुंबईत एकूण 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी […]

गुन्हा नागपूर

नागपुरात चोरट्यांनी मारला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी डल्ला

चोरट्यांनी थेट पोलिसांची बंदूक आणि गोळ्याच चोरल्या आहेत.  पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातून पिस्टल आणि 30 जिवंत काढतूस चोरीला गेल्याची घटना नागपुरात घडली आहे. नागपुरात  राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडंटच्या गनमॅनचे बंदुकीच्या 30 गोळ्यासह पिस्टल चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिस्टल आणि काडतुस चोरट्यांनी पोलीस वसाहतीतील घरात घुसून पळविले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करण्याची […]

गुन्हा नागपूर

जीवघेणा हल्ला प्रकरण अल्पवयीनसह सहा आरोपींना अटक

किरकोळ वादातून नागपुरातील मेडिकल चौकातील एका पबमध्ये 25 डिसेंबरच्या पहाटे झालेल्या मारहाण प्रकरणाचा सीसीटीव्ही  व्हिडिओ समोर आला आहे. या प्राणघातक हल्यात कुख्यात गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने भारतीय जनता पक्षाचे नेते मुन्ना यादव (Munna Yadav) यांच्या मुलासह तिघांवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणातील तपसाचे धागेदोरे पुढे सरकल्या नंतर या हल्ला प्रकरणात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 […]

गुन्हा

1200 रुपयांमध्ये बनावट आधार कार्ड बनवायचे… पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली

बनावट आधारकार्ड बनवणाऱ्या गुजरातमधील उना येथून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपीने बँका आणि शासकीय कार्यालयात काम केले आहे. त्याचे यूपीशी संबंध उघड झाले आहेत. बनावट आधारकार्ड बनवण्यासाठी तो 1200 ते 25 हजार रुपये आकारायचा. त्याच्याकडून 17 लाख रुपयांचा व्यवहार उघडकीस आला आहे. उना येथील एका दुकानात बनावट आधारकार्ड बनवले जात असून पुराव्याशिवाय […]

गुन्हा

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमीष, महिलेस २५ लाखांनी गंडविले

शेअर खरेदी-विक्रीत गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल, असे आमीष दाखवून बँकेत लिपीक असलेल्या महिलेजवळ असलेली २५ लाखांची जमापूंजी सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन हडपली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३४ वर्षीय पीडित महिला जरीपटका पोलीस ठाण्याहद्दीत राहते. ती राष्ट्रीयकृत बँकेत लिपीक या पदावर आहे. ६ नोव्हेंबर २०२३ ला ती घरी असताना लिंक […]

गुन्हा

वैद्यकीय अधीक्षक ४८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलं

 येथील स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन पांडुरंग वासेकर यांना ४८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २३ डिसेंबरला सायंकाळी धाड नाका परिसरात रंगेहात पकडले.  या कारवाईमुळे बुलढाण्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये बजावलेल्या कर्तव्याचे सहा लाख रुपये तक्रारदार कर्मचाऱ्यास […]

गुन्हा

भिवंडीत लेडीज बारवर छापा; ७ बारबालांसह ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल

भिवंडीपोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर डान्स बार चे पेव फुटले असून तेथे सुरू असलेल्या बारबालां कडून अश्लील हावभाव करीत मद्यापी ग्राहकांना आकर्षित केले जात असल्याच्या तक्रारी वाढत असताना नारपोली पोलिसांनी सिल्व्हर पॅलेस बार अँड रेस्टॉरंट वर केलेल्या कारवाईत सात बारबाला व पाच ग्राहकांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           अंजुरफाटा ते धामणकर नाका […]

गुन्हा

कामगारानं ‘नग्न’ होऊन व्हिडीओ कॉल केला अन् ६ लाख गमावून बसला

हे सोशल मीडियाचे जग आहे, इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. सोशल मीडियामुळे बहुतांश गोष्टी सोप्या पद्धतीने उपलब्ध होऊ लागल्या आहेत. इंटरनेटवर सर्च करताच जगभरातील माहिती क्षणात आपल्यापर्यंत पोहचते. मात्र, अनेकदा या तंत्रज्ञानाचा दुरूपयोग होताना दिसतो. याचाच प्रत्यय गुजरातमधील सूरत येथून आला आहे. येथील एका ‘हौशी’ कामगाराने तरूणीला नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करून स्वत:ची मोठी फसवणूक करून घेतली. […]

गुन्हा

डॉक्टरला खंडणीची मागणी

उपराजधानीतील गुन्हेगारीचे पडसाद राज्याच्या विधीमंडळातदेखील उमटले असताना हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भर अधिवेशन काळातच गुंडांनी एका डॉक्टरला खंडणीची मागणी केली. तसेच त्यांना दोन लाखांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. डॉ.गजानन प्रल्हादराव पवाने (५३, एमआयजी कॉलनी, मेडिकल चौक) यांचा […]

गुन्हा

दीरासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची हत्या

गुरुवारी सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पाच पथके नेमल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. आरोपी अमित आणि त्याची पत्नी भावना यांचे आठ वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे. ते मुळचे हरयाणा राज्यातील खरडालीपूर (जि. इसार) येथील रहिवाशी आहेत. अमितला दारुचे प्रचंड व्यसन असल्यामुळे भावना […]