ठाणे

मालाड पश्चिम : ऍकमे शॉपिंग सेंटरला भीषण आग

सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. मालाड पश्चिमेकडील जैन मंदिर रोडवरील ऍकमे शॉपिंग सेंटरला ही आग लागली आहे. ऍकमे शॉपिंग मॉल मधील पहिल्या मजल्यावरील वातानुकूलित यंत्राला ही आग लागली असल्याचे समजते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. शॉपिंग मॉलला लागलेली आग […]

कोकण वृत्त नवी मुंबई

खारघरमध्ये निरसूख पॅलेस हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई

खारघर मध्ये सिडकोच्या अनधिकृत नियंत्रण बांधकाम विभागाच्या वतीने येथील सेक्टर 10 मधील निरसूख पॅलेस हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर दि.28 रोजी कारवाई करण्यात आली. सिडकोच्या जागेवर विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली. यावेळी सिडकोचे पथक पोलिसांचा मोठा फौजफाटा,जेसीबीच्या साहाय्याने घटनास्थळी दाखल झाले होते. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिकारी लक्ष्मीकांत डावरे यांच्या मार्गदर्शनात हि कारवाई करण्यात आली. […]

कोकण वृत्त ठाणे

भिवंडी मनपाच्या ११ गैरहजर कामगारांना कारणे दाखवा नोटीस

 भिवंडी महापालिकेतील सफाई कर्मचारी हप्ते देऊन कामावर गैरहजर राहत असल्याच्या अनेक तक्रारी मनपा प्रशासनास प्राप्त झाल्याने मनपा आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार बुधवारी मनपा प्रभाग २ मधील कॅबिन क्रमांक १२ मध्ये सहाय्यक आयुक्तांनी अचानक भेट देऊन कामगारांची तपासणी केली असता तब्बल ११ कामगार गैरहजर असल्याची बाब उघड झाली आहे. या ११ गैरहजर कामगारांना मनपा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस […]

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात रक्ताचा तुटवडा; केवळ ४० बॅगा शिल्लक

सध्या सर्दी, खोकला, तापसरी याचबरोबर डेंग्यूसारखे आजारही वाढले असल्याने गंभीर रूग्णाला जिल्हा रूग्णालयात दाखल करावे लागते. प्रसुतींची संख्या वाढली आहे, अपघातांमध्ये गंभीर होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीतून प्रसूतीसाठी येणाऱ्या माता, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, आर्थिक दुर्बल, हिमोफिलीया, थॅलिसिमिया सारख्या आजारग्रस्त रूग्णांना मोफत रक्त पुरवठा केला जातो. त्यामुळे या रूग्णालयाच्या रक्तपेढीची गरज वाढली आहे. रक्तपेढीतर्फे रक्तदात्यांची यादी तयार […]

कोकण वृत्त मुंबई

‘आरटीओ’तील भ्रष्टाचाराला चाप; नागरिकांचा ‘फेसलेस’कडे ओढा

बनावट पावत्या, सह्या, नोंदणीच्या माध्यमातून काही दलाल भ्रष्टाचार करीत होते.  परिवहन खात्याने ‘आरटीओ’तील भ्रष्टाचार संपविण्यासाठी घरबसल्या ऑनलाइन परीक्षेतून वाहन परवाने देणे सुरू केले.  काही गैरप्रकार समोर आले होते. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी कॅमेऱ्याच्या नजरेत फेसलेस सुविधा राज्यभरात राबविली जात आहे. त्यामुळे नागरिकांना  घरबसल्या पारदर्शी पद्धतीने वाहन चालविण्याचे शिकाऊ परवाने कॅमेऱ्याच्या नजरेतील परीक्षेतून मिळत आहे. त्यामुळे दलालांनाही […]