महाराष्ट्र

*(स्ट्रीटलाईट पोल पडणे, घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.)

दिनांक ०९/०८/२०२३ * पातलीपाडा सर्कल, घोडबंदर रोड, ठाणे, (प.) या ठिकाणी पातलीपाडा सर्कल वरून हिरानंदानी इस्टेटकडे जाणाऱ्या रस्त्यावरती स्ट्रीट लाईट पोल पडला होता. *सदर ठिकाणी ठा.म.पा. विद्युत वायरमन व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी २ पिकअप वाहनासह उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. *सदर ठिकाणी रस्त्यावरती पडलेला स्ट्रीट लाईट पोल ठा.म.पा. विद्युत वायरमन व आपत्ती […]

आरोग्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील भोंगळ कारभाराबद्दल आंदोलन करण्यात आलं. डेंग्यूचा होत असलेला प्रसार, शहरी गरीब योजने बद्दलचा गोंधळ, दवाखान्याचे खाजगीकरण, औषधांचा तुटवडा अश्या अनेक समस्या पुणे शहरात आहेत. मनपा आयुक्तांनी लवकरात लवकर या समस्यांवर उपाय योजना कराव्यात; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आग्रही मागणी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील भोंगळ कारभाराबद्दल आंदोलन करण्यात आलं. डेंग्यूचा होत असलेला प्रसार, शहरी गरीब योजने बद्दलचा गोंधळ, दवाखान्याचे खाजगीकरण, औषधांचा तुटवडा अश्या अनेक समस्या पुणे शहरात आहेत. मनपा आयुक्तांनी लवकरात लवकर या समस्यांवर उपाय योजना कराव्यात; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आग्रही मागणी. #मनसे

राजकारण

#शिंदेंचा_ठाकरेंना_आणखीन_एक_धक्का..! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विक्रोळी टागोर नगर विभागाचे शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

#शिंदेंचा_ठाकरेंना_आणखीन_एक_धक्का..! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विक्रोळी टागोर नगर विभागाचे शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या धारावी येथील माजी नगरसेविका रेश्मा बानो वकील शेख आणि जोगेश्वरी येथील माजी नगरसेविका नाजिया सोफिया यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी पक्षात स्वागत करून […]

महाराष्ट्र

वर्तकनगर पोलीस स्टेशन प्रॉपर्टी मिसिंग मधील विविध कंपनी चे एकूण ३ मोबाईल मपोहवा/वाय.सी.घोडे व पोहवा/रावते यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून तक्रारदार यांना मा. सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांच्या हस्ते सुपूर्द केले.

पावसाळ्यातील #साथरोग च्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहून विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. साथरोगांचे प्रमाण वाढत असलेल्या भागात एक वॉर रूम तयार करावी, असे निर्देश आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे याबाबतच्या आढावा बैठकीत दिले.

व्यवसाय

#शासन_आपल्या_दारी #जेजुरी येथील कार्यक्रमात ६९ स्टॉल्सद्वारे शासनाच्या आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, जिल्हा उद्योग केंद्र तसेच केंद्र व राज्य शासन पुरस्कृत आवास योजना आदींची माहिती देण्यात आली. या उपक्रमात महिला, युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री.अमित ठाकरे यांनी आज सातारा जिल्ह्यातील मनविसेच्या खालील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

मराठी भाषेचा विकास, संवर्धन, प्रसारासाठी गोमंतक मराठी अकादमी, महाराष्ट्र मंडळ गोवा व महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी १५ ऑक्टोबरपासून संयुक्तपणे ग्रंथोत्सव, चर्चासत्र आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे तथा Maharashtra DGIPR चे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी पणजी येथे दिले. . . माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र सक्षमीकरणाबाबत आज गोवा मनोरंजन सोसायटीच्या परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोवा माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, गोमंतक मराठी अकादमी परवरी अध्यक्ष प्रदीप घाडी-आमोणकर, उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर उपस्थित होते.

मराठी भाषेचा विकास, संवर्धन, प्रसारासाठी गोमंतक मराठी अकादमी, महाराष्ट्र मंडळ गोवा व महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी १५ ऑक्टोबरपासून संयुक्तपणे ग्रंथोत्सव, चर्चासत्र आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे तथा Maharashtra DGIPR चे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी पणजी येथे दिले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र सक्षमीकरणाबाबत आज गोवा मनोरंजन सोसायटीच्या परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन […]

Politics

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र जेजुरी जेजुरी गड विकास आराखड्याच्या ३४९ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ३ टप्प्यांमध्ये हा आराखडा राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गडकोटातील मुख्य मंदिर, इतर छोटी मंदिरे, ओवऱ्या आणि तटबंदीचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहेत. तसेच मुख्य गडकोट व कडे पठार परिसरातील १५४ दीपमाळांची जतन व दुरुस्ती, १ हजार ३११ पायऱ्या आणि १५ कमानींची जतन व दुरुस्ती, कडे पठार येथील खंडोबाचे मुख्य मंदिर, परिसरातील इतर ८ मंदिरे व कमान, ओवऱ्यांचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र जेजुरी जेजुरी गड विकास आराखड्याच्या ३४९ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ३ टप्प्यांमध्ये हा आराखडा राबविण्यात येणार आहे.   पहिल्या टप्प्यात गडकोटातील मुख्य मंदिर, इतर छोटी मंदिरे, ओवऱ्या आणि तटबंदीचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहेत. तसेच मुख्य गडकोट व कडे पठार परिसरातील १५४ […]