राजकारण

स्मरणशक्तीत गडबड, असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही – भुजबळ

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २० जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, येवल्याच्या येडपटा आता शांत बस. काही वेडवाकडं बोलू नको. झोपून राहा. माझ्या नादाला लागू नको. नाहीतर दणकाच दाखवेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला. यावर आता छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद […]

राजकारण

मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने, किती रस्ते झाले दाखवा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेतील घोटाळ्यांवरून ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका करताना, मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने होत असल्याचे म्हटले आहे.  प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्ही मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने करत आहात. एमटीएचएलचे ८३ टक्के काम आमच्या सरकारमध्ये पूर्ण झाले आहे. आता उद्घाटनला एवढा वेळ […]

राजकारण

संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली – दीपक केसरकर

 राज्यातील महाविकास आघाडीत जागावाटपावरून नाराजीनाट्य घडू शकते, असे म्हटले जात आहे. ठाकरे गट लोकसभेच्या २३ जागा लढणार असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावरून आता प्रतिक्रिया येत आहेत. यातच संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली, अशी टीका शिंदे गटातील नेत्यांनी केली आहे.  शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना फुटीबाबत भाष्य केले. उद्धव ठाकरे यांचे मत हिंदुत्वाबरोबर जाण्याचं होतं. […]

राजकारण

जितेंद्र आव्हाड एकाकी पडल्यामुळे भ्रमिष्ट अवस्थेत – हसन मुश्रीफ

 राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड या दोघांमध्येही वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपासोबत जाण्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना यांनाच सगळं कळतंय का? असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत हसन मुश्रीफ यांनी निशाणा साधला. जितेंद्र आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाहीत. ते एकाकी […]

राजकारण

काँग्रेसमध्ये फेरबदल; महाराष्ट्राचे प्रभारी बदलले सचिन पायलटांकडे मोठी जबाबदारी

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी आपल्या संघटनेत मोठा बदल करत 12 सरचिटणीस आणि 12 राज्य प्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.  काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या जागी अविनाश पांडे यांना उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी बनवण्यात आले आहे. […]

राजकारण

तुरुंगात जाईन; पण, माफी मागणार नाही – सुषमा अंधारे

मी कोणताही गुन्हा केलेला नसून माझ्याकडून झालेली चूक नकळत आहे. केवळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून मला कोणी झुकवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी अजिबात माफी मागणार नाही. त्यासाठी मला तुरुंगात टाकले तरी चालेल, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र पाठवले आहे. उपसभापतींची बदनामी केल्याप्रकरणी अंधारेंवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी आमदार प्रवीण […]

राजकारण

नेमकी पनौती कोण, हे काँग्रेसला आज कळले असेल; फडणवीसांचा कॉंग्रेसला चिमटा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांदरम्यान कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘पनौती’ अशी टिप्पणी करत सोशल माध्यमांवर मोहीमच चालवली होती. मात्र निकालानंतर भाजप नेत्यांनी या ट्रेंडवरून कॉंग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. चारपैकी तीन राज्यात भाजपाला मिळालेले अभूतपूर्व यश हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पारदर्शी प्रामाणिकतेचा विजय आहे. या निकालाने नेमकी पनौती कोण, हे काँग्रेसला आता कळून चुकले असेल, […]

राजकारण

जिंकणाऱ्यांचं अभिनंदन, निकाल अपेक्षित, अनपेक्षित, ज्याचं ते बघतील; पण..! 4 राज्यांतील निकालावर काय म्हणाले उद्धव ठाकरे

आज चार राज्यांचे निकाल लागले जे जिंकले त्यांचे अभिनंदन करतो. अगदी मोकळ्या मनाने करतो. निकाल अपेक्षित अनपेक्षित, हे ज्याचं ते बघतील. पण जे-जे जिंकले त्या सर्वांचं अभिनंदन. यालाच लोकशाही म्हणतात. अशीच लोकशाही देशात टिकायला हवी आणि ती टिकावी यासाठीच आपण लढत आहोत. 2024 ची निवडणूक यासाठी महत्वाची आहे की, आता जशा निवडणुका होत आहेत. तशाच त्या 2024 […]

राजकारण

“विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम नाही, मविआ-इंडिया आघाडी मजबूत”; काँग्रेसला विश्वास

विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तिसगडमध्ये विजयी झाला होता. भाजपचा पराभव झाला होता, ते चित्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले नाही, त्याप्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आजचे चित्र दिसणार नाही, त्यात बदल होईल. काँग्रेस पक्षाचा मोठा विजय होऊन केंद्रात सत्तेत येईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी […]

राजकारण

“तेलंगणातील विजयाचा फायदा महाविकास आघाडीला”; रोहित पवारांचा अजित दादांनाही टोला

विधानसभा निवडणूक झालेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने विरोधकांना अस्मान दाखवलं. या निकालाचे पडसाद देशभर उमटत असून भाजपच्या विजयामुळे एनडीएला पाठिंबा जाहीर केलेले राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच खूश झाल्याचं पाहायला मिळालं. आमचा निर्णय काहींना पटला नाही, पण देशाला मोदींशिवाय पर्याय नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे. मात्र, या निकालावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी शिंदे […]