देश विदेश

इंडोनेशियात माऊंट मेरापीवर ज्वालामुखीचा उद्रेक; पर्यटनाला गेलेल्या ११ गिर्यारोहकांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

इंडोनेशियाच्या माउंट मेरापीवर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची घटना घडली आहे. या भयंकर उद्रेकात ११ गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या ज्वालामुखीची राख तीन किलोमीटर उंच उडाल्याचंही सांगण्यात आलं आहे. मीडिया वृत्तानुसार, इंडोनेशियाच्या माउंट मेरापीवर झालेल्या ज्वालामुखीच्या घटनेनंतर २६ बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. या ज्वालामुखीनंतर सोमवारी सकाळी ११ गिर्यारोहकांचा मृतदेह सापडले आहेत. तर अन्य बेपत्ता २२ गिर्यारोहकांचा […]

देश विदेश

मिझोराममध्ये ZPM ची एकहाती सत्ता

मिझोराममध्ये विधानसभेच्या ४० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत झोरम पीपल्स मुव्हमेंट (ZPM) पक्षाला बहुमत मिळालं आहे. हाती आलेल्या निकालानुसार, ZPM ला २७ जागांवर विजय मिळवलाय. तर MNFला ९ जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे तीन राज्यात सपाटून पराभव मिळालेल्या काँग्रेसला येथे धक्का बसलाय. मिझोराममध्येही भारतीय जनता पक्षाने काँग्रेसलामागे सोडलंय. येथेही एक्झिट पोलपेक्षा वेगळे निकाल लागले आहेत. एक्झिट पोलमध्ये मिझोराम फ्रंटला बहुमत मिळेल असा […]

देश विदेश

मणिपूरमध्ये दोन गट भिडले, १३ जणांचा मृत्यू

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला. तेंगनोउपल जिल्ह्यात सोमवारी दुपारी दोन गट भिडले. बेछूट गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेंगनोउपल जिल्ह्यातील लेतीथू गावाजवळ दोन गटांकडून गोळीबार झाला. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. रिपोर्ट्सनुसार, मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही. रविवारीच राज्यात सात महिन्यांनंतर मोबाइल इंटरनेट सेवेवरील […]

देश विदेश

चक्रीवादळामुळे चेन्नईत ५ जणांचा मृत्यू; उद्या तेलंगणासाठी रेड अलर्ट

चेन्नईमधील चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे झाडे कोसळली असून अनेक ठिकाणी विद्युत अपघातांचे प्रकार घडले आहेत. यात ५ जणांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. Tamil Nadu | 12 Madras Unit of Indian Army rescues people from Mugalivakkam and Manapakkam areas in Chennai that are affected by heavy rainfall and massive waterlogging. (Pics: Defence PRO) pic.twitter.com/33eLXMYB5O […]

देश विदेश

आगामी बैठकीकडे ममता बॅनर्जी पाठ फिरवणार

विरोधकांच्या इंडिया आघाडीची बुधवारी ६ डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बैठकीकडे ममता बॅनर्जी पाठ फिरवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेतेही गैरहजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. […]