कोल्हापुर

कोल्हापुरातील आंदोलनाचा ४८ वा दिवस, सरकारविरोधात घोषणाबाजी

 मराठा आरक्षण मिळेपर्यंत या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे चार संघटनांनी शनिवारी दसरा चौकात जाहीर केले. सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत सकल मराठा समाजाने साखळी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचा शनिवारी ४८ वा दिवस होता.

दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या धरणे आंदोलनाला काेल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघ, सीपीआरमधील डी.एम. एंटरप्रायजेस स्वच्छता कर्मचारी संघटना, वीज कामगार महासंघ, मोतीबाग तालमीचे पैलवान, तसेच शहाजी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पाठिंबा दिला.

धान्य दुकानदार महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे, बाबासाहेब पाटील भुयेकर, अरुण शिंदे, अशोक सोलापूर, सीपीआरच्या स्वच्छता कर्मचारी विजय पाटील, सुधीर बुवा, रोहित कोंडविलकर, वीज कामगार महासंघाचे तानाजी हाटगे, संदीप शिंदे, राम जगताप, मोतीबाग तालमीचे हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, शहाजी कॉलेजच्या सानिका लाड, शिवानी पोवार, श्रध्दा नलावडे या विद्यार्थिनींनी पाठिंबा दिला. पैलवान विष्णू जोशीलकर आणि धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांच्यासह ॲड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे यांनीही मराठा आंदोलनातील टप्प्यांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *