तंत्रज्ञान आणि विज्ञान

Facebook-Instagram वर मिळणार नाही ‘हे’ फीचर; कंपनीने केली बंद करण्याची घोषणा

Meta लवकरच आपली एक खास सर्व्हिस बंद करणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीने क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजिंग खूप पूर्वी लॉन्च केलं होतं. त्याच्या मदतीने, युजर्स Facebook आणि Instagram वर दुसऱ्या युजर्सच्या मेसेजचं उत्तर क्रॉस प्लॅटफॉर्मवर देऊ शकतात. 

कंपनीने तीन वर्षांपूर्वी ही सर्व्हिस सुरू केली होती. कंपनीने आता हे फीचर बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ तुम्ही फेसबुकवर येणाऱ्या मेसेजला फक्त फेसबुक मेसेंजरद्वारेच उत्तर देऊ शकाल.

इन्स्टाग्रामच्या बाबतीतही असेच आहे. येथे देखील तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर इन्स्टाग्रामवर येणाऱ्या DM ला उत्तर द्यावं लागेल. मात्र, कंपनीने हे फीचर बंद करण्याचे कारण दिलेलं नाही.

कधी बंद होणार हे फीचर?

मेसेंजरवर एंड टू एंड एन्क्रिप्शन फीचर जोडले जाणार असताना मेटाने हा निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या अखेरीस फेसबुक मेसेंजरवर हे फीचर येऊ शकतं असा अंदाज आहे. इन्स्टाग्राम सपोर्ट पेजवर कंपनीने माहिती दिली आहे की, डिसेंबरच्या मध्यापासून क्रॉस एप कम्युनिकेशन चॅट्स बंद केले जातील.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे फीचर डिसेबल केल्यानंतर, कोणत्याही प्लॅटफॉर्मवरील युजर्स इतर प्लॅटफॉर्मवरील मेसेजना प्रतिसाद देऊ शकणार नाहीत. मात्र ते मेसेज वाचू शकतात. याशिवाय, चॅट हिस्ट्री देखील मिळेल. हे फीचर बंद केल्यानंतर, तुम्ही इन्स्टाग्राम वापरून फेसबुक युजर्सशी चॅट करू शकणार नाही.

फेसबुकच्या बाबतीतही असेच घडेल. एक्टिव्हिटी स्टेटस सेटिंग फीचरच्या मदतीने जे फेसबुक युजर्स तुम्हाला ऑनलाइन पाहू शकत होते किंवा तुमचे मेसेज पाहू शकत होते, त्यांनाही आता हे फीचर मिळणार नाहीत. दोन्ही प्लॅटफॉर्मवर चॅटिंग सुरू ठेवण्यासाठी, तुम्हाला नवीन चॅट सुरू करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *