ISRO चे चंद्रयान 3 ५ ऑगस्ट रोजी चंद्रायवर पोहोचले. आता चंद्रयान-3 चंद्राभोवती १७० किमी x ४३१३ किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत चंद्राभोवती १९०० किमी प्रति सेकंद या वेगाने फिरत आहे. चंद्रयानातून काढलेले चंद्राची पहिले फोटो पाठवले आहेत. प्रत्येक फोटोत डाव्या बाजूला असलेले सोनेरी रंगाचे दिसणारे यंत्र चंद्रयानचे सोलर पॅनल आहे. चंद्राचा पृष्ठभाग आणि त्याचे खड्डे समोर दिसत आहेत. प्रत्येक फोटोत ते वाढत असल्याचे दिसत आहे. ९ ऑगस्ट रोजी दुपारी २.४५ च्या सुमारास त्याची कक्षा ४ ते ५ हजार किलोमीटरच्या कक्षेत बदलली जाईल. प्रत्येक फोटोसह चंद्र मोठा आणि गडद होईल. १४ ऑगस्ट रोजी दुपारी यात घट करुन १००० किलोमीटर केले जाणार आहे. पाचव्या ऑर्बिट मॅन्युव्हरमध्ये, ते १०० किमीच्या कक्षेत ठेवले जाईल. १७ ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. १८ आणि २० ऑगस्ट रोजी डिऑर्बिटींग होईल. म्हणजेच चंद्राच्या कक्षेतील अंतर कमी होईल. लँडर मॉड्यूल १०० x ३५ किमीच्या कक्षेत जाईल. यानंतर २३ रोजी संध्याकाळी ५.४७ वाजता चंद्रयानचे लँडिंग केले जाईल. चंद्राची कक्षा पकडण्यासाठी चंद्रयान-3 चा वेग ताशी ३६०० किलोमीटर इतका वाढवण्यात आला. कारण चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा सहापट कमी आहे. जर जास्त वेग असता तर चंद्रयानाने तो पार केला असता. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चंद्रयानचा वेग २ किंवा १ किलोमीटर प्रति सेकंद कमी केला. या वेगामुळे तो चंद्राची कक्षा पकडू शकला. आता हळूहळू चंद्राभोवतीच्या त्याच्या कक्षेतील अंतर कमी करून ते दक्षिण ध्रुवाजवळ उतरवले जाईल. चंद्रयान-3 यापूर्वी ट्रान्स लूनर ट्रॅजेक्टोरीमध्ये २८८ x ३६९३२८ किलोमीटर अंतरावर प्रवास करत होता. जर तो चंद्राची कक्षा पकडू शकला नसता तर २३० तासांनंतर तो पृथ्वीच्या पाचव्या श्रेणीच्या कक्षेत परत आला असता. इस्रोला पुन्हा चंद्रावर पाठवण्याचा दुसरा प्रयत्न करता आला असता. ज्या कोणत्या देशांनी किंवा अवकाश संस्थांनी त्यांच्या रॉकेटद्वारे थेट चंद्राच्या दिशेने अंतराळयान पाठवले. त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तीनपैकी एक मोहीम अयशस्वी झाली. पण इस्रोने जो मार्ग आणि पद्धत निवडली आहे, त्यात अपयश येण्याची शक्यता फारच कमी आहे. आता पुन्हा मिशन पूर्ण करण्याची संधी आहे.
Related Articles
महिलांसाठी Alert! फोटोतून कपडे हटवून निर्वस्त्र करणारा AI धक्कादायक रिपोर्ट
सध्या एआयचा जमाना सुरु झाला आहे. कोणतीही गोष्ट ही चांगल्या वापरासाठी, भल्यासाठी शोधली जाते, परंतू वाईट प्रवृत्ती त्याता वापर वाईटासाठी करतात याचा अनुभव जगाने अनेकदा घेतला आहे. अणु उर्जेचा शोध कशासाठी लावला गेला आणि त्याचा वापर अणुबॉम्ब, अण्वस्त्रांसाठीही झाल्याचे जगाने पाहिलेय, भोगले आहे. एआयचेही तसेच होताना दिसत आहे. एआय हे तंत्रज्ञान उपयुक्त जरी असले तरी […]
दूरसंचार विभागानं बदलला पेपर KYC चा नियम
मोबाइल कनेक्शन घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमच्यासाठी नवीन कनेक्शन खरेदी करणं सोपं व्हावं आणि डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी दूरसंचार विभागानं एक नवीन नियम जारी केला आहे. या नवीन नियमानुसार १ जानेवारी २०२४ पासून तुम्हाला मोबाइल कनेक्शन घेताना पेपर केवायसी (KYC) करावं लागणार नाही. म्हणजेच तुम्हाला सर्व आवश्यक माहिती डिजिटल पद्धतीनं सबमिट करावी लागेल. मिनिस्ट्री ऑफ […]
इस्रो पुन्हा इतिहास रचणार, 30 जुलैला एकाच वेळी 7 उपग्रह प्रक्षेपित करणार
बेंगळुरू: भारत 30 जुलै रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून PSLV-C56 द्वारे सिंगापूरचा DS-SAR उपग्रह आणि इतर सहा उपग्रह प्रक्षेपित करेल. अंतराळ संस्थेने सांगितले की, सकाळी 6.30 वाजता श्रीहरिकोटा केंद्रातील पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाईल. DS-SAR उपग्रह सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान एजन्सी (DSTA) आणि सिंगापूरच्या ST अभियांत्रिकी यांच्यातील भागीदारी […]