आरोग्य

तुम्हालाही अतीविचार करण्याची सवय आहे का ?

तुम्हालाही मध्यरात्री पुढच्या दिवसांचे विचार भेडसावतात का? किंवा दिवस भरात घडलेला एखादा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत रहातो का? काही किरकोळ आजार झाल्यास भलभलत्या विचारांनी आणि असंख्य नकारात्मक विचारांनी खूप अस्वस्थ होते का? मनात विचार रवंथ करतात का? मग हे जाणून घ्या…
भारतात जवळपास २४ टक्के लोकसंख्या या वर्गात मोडते, असे संशोधन दाखवते. यावरून असे दिसून येते की विज्ञानाने आपल्या आरामात आणि चैनीत भर तर घातली आहे, परंतु मनास समाधान देण्यास ते अक्षम ठरले आहे. किंबहुना जितका अधिक आराम, तितका नकारात्मक विचारांच्या वादळासाठी अधिक मोकळा वेळ. मनाला जर वेळेतच सवय लावली नाही किंवा लगाम घातला नाही तर ते रिकामे मन स्वतःला अधिक विचारांमध्ये गुंतवून ठेवते. शिवाय सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारच जास्त येतात.

असे का होते?

१. आपला मेंदू अशा प्रकारे बनला आहे की तो भविष्यातील संभाव्य धोक्यांची कल्पना करतो आणि जगण्यासाठी त्यांना सामोरे जाण्यास तयार करतो.
२. उत्क्रांतीने हे सिद्ध केले आहे की ( Survival of fittest) साठी जीवघेण्या परिस्थितीत, स्वसंरक्षणासाठी (self-defence) साठी (Fight) लढा, (Flight)पळा किंवा (Freeze) स्तब्ध रहा हे पर्याय उपलब्ध होते. हे (limbic) आदिम प्रतिसाद होते.
३. आता उत्क्रांती नंतर, करा किंवा मरा ही परिस्थिती नाही, तरीही आपले मन अजूनही पुर्वीसारखेच प्रतिसाद देते. फरक हा आहे की ‘लढाईने’ आक्रमकतेचे (aggression) रूप घेतले आहे तर ‘पळण्याचे’ रुपांतर नैराश्यात (Depression) आणि स्तब्धतेचे चिंतेत (anxiety) रुपांतर झाले आहे .
४. आता भीती ही जीवन आणि मृत्यूची नसून मानसिक−सामाजिक दबावाची आहे. आपण समस्येचा परिस्थितीला (dead-line) लक्ष्याची अंतिम रेषा समजतो.
एक छोटीशी समस्या, एक भव्य आव्हान किंवा आपत्ती म्हणून समजली जाते.
५. माझ्या क्लिनिकल प्रॅक्टीस दरम्यान असे लक्षात आले आहे की लहान मुलांमध्येही चिंता वाढत आहे. त्यांच्या स्वतः विषयीच्या अपेक्षा वाढत आहेत. परीक्षेचे दडपण, स्पर्धा, अव्वल यादीत येण्याचे वेड, मोबाईलमध्ये अधिक गुंतणे , ईतरांशी संवाद नसणे आणि वास्तविकतेचा भान नसणे ही काही कारणे आहेत जी त्यांना असुरक्षित बनवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *