आरोग्य

आरोग्य पाळी सुरु होताना आणि त्या ४ दिवसांतही पोट खूप दुखतं ?

मासिक पाळीच्या दिवसांत पोट दुखीचा त्रास बहुतांश तरुणींना होत असतो. अनेक जणींना तर हा त्रास अजिबात सहन होत नाही. मग बऱ्याचदा शाळा, कॉलेज, ऑफिसला जाणंही काही जणींना शक्य होत नाही. पाेटदुखी कमी करण्यासाठी मग अनेक जणी गोळ्या घेतात, पण वारंवार दर महिन्यातच अशा गोळ्या घेणे नकोसे वाटते. म्हणून पोटदुखी थांबविण्यासाठी आता हा एक आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic Home remedies for pains during periods) करून पाहा. पाळी सुरू झाली की हा काढा घ्या. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीही पोट दुखत असेल तर दिवसांतून एकदाच हा काढा घ्यावा. (Special drink or kadha for reducing menstrual pain)

हा काढा कसा तयार करायचा, याविषयीचा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी इन्स्टाग्रामच्या missherbofficial या पेजवर सुचविला आहे. काढा तयार करण्यासाठी आपल्याला एक कप गरम पाणी, १ टीस्पून आल्याचा किस, अर्धा टी स्पून हळद, १ टीस्पून मध, अर्धा टीस्पून लिंबाचा रस एवढं साहित्य लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *