गुन्हा मुंबई

रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी तीन जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात

 रिझर्व्ह बँक (Reserve Bank OF India) धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे. तिघांनाही गुजरातमधील बडोद्यातून ताब्यात घेतलं आहे.  खिलाफत इंडिया या नावाने रिझर्व्ह बँकेला ईमेल आला होता. संशयित आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. खिलाफत इंडिया या ई-मेलवरून धमकी आली होती. या  ईमेलमुळे मोठी खळबळ उडाली होती. 

मुंबईत एकूण 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक मेल मंगळवारी दुपारी आला होता. दुपारी दीड वाजता हे बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचं त्यात म्हटलं होतं. पोलिसांनी या सर्व ठिकाणी शोधमोहीम केली असता काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्यानंतर एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यानंतर मुंबई पोलीस त्याचबरोबर गुन्हे शाखा सतर्क झाले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथक तयार केले होते. 24 तासातच मुंबई पोलिसांनी  कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे. सध्या आता या संशयित आरोपींची चौकशी सुरू झाली असून हा मेल का केला होता आणि त्याच्या मागचा उद्देश काय होत आहे हे मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *