शेतकरी मित्र

नोव्हेंबरअखेरीस राज्यात ४६.५२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण, अवकाळी पावसाने पिकांची वाताहात

राज्यात नोव्हेंबर अखेरीस ४६.५२ टक्के रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अवकाळी पावासाने पिकांवर पाणी फेरले असून गारपीटीचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे.

आधीच परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यात रब्बी पेरण्यांना उशीर झाला होता. त्यात सरासरीच्या मागील आठवड्यात केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. पेरण्यांचे क्षेत्र वाढत असतानाचा झालेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांसह रब्बी पिकांनाही झोपवले.

राज्य कृषी विभागाने जाहीर केलेल्या पेरणी अंदाज अहवालानुसार, राज्यात यंदा रब्बीचे सरासरी क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर एवढे आहे. तर आतापर्यंत २५ लाख १० हजार ४५१ क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी याच वेळी साधारण ३० लाख ६४ हजार ५५८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या.

विभागनिहाय किती टक्के झाल्या पेरण्या?

कोकण  २०.८२
नाशिक १८.८८
पुणे ५४.२३
कोल्हापूर ४७.१९
छत्रपती संभाजीनगर ४१.३०
लातूर ६२.३१
अमरावती ३५.८४
नागपूर ३७.२६

काढणीला आलेल्या पिकांची वाताहात

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके भूईसपाट झाली आहेत. रब्बी पिकांसह खरीपात काढणीला आलेल्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. सुमारे ४६.५२ टक्के पेरण्या झालेल्या असताना अवकाळीमुळे पावसामुळे आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी  अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे.  काढणीला आलेल्या पीकांची वाताहात झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

तृणधान्यांचे क्षेत्र घटते…

राज्यात आठ विभागांचे सरासरी तृणधान्य क्षेत्र तीस लाख 71 हजार 542 हेक्टर एवढे आहे. यामधील केवळ 12 लाख 86 हजार 152 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष तृणधान्य पेरणी झाली आहे. देशात हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून ओळखले जात असताना तृणधान्यांचे क्षेत्र मात्र कमी होताना दिसत आहे.  यंदा कमी झालेल्या सरासरी पावसामुळे तृणधान्यांच्या क्षेत्रात घट असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *