शासकीय योजना

लेक लाडकी योजना महाराष्ट्र

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली. लेक लाडकी योजना 2023 असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून तर तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल. या मध्ये मुलगी अठरा वर्षाची पूर्ण होईपर्यंत ही आर्थिक मदत सरकारकडून केली जाईल. जे विविध वयोगटातील वर्ग श्रेणीनुसार दिली जाईल. लेक लाडकी योजना विशेषतः राज्यातील मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन राज्यात महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते.

लेक लाडकी योजना Highlights 

योजनालेक लाडकी योजना महाराष्ट्र
व्दारा सुरुमहाराष्ट्र शासन
योजना आरंभ2023
लाभार्थीराज्यातील मुली
अधिकृत वेबसाईटलवकरच अपडेट
उद्देश्यराज्यातील मुलींचे सक्षमीकरण
विभागलवकरच अपडेट
लाभया योजनेंतर्गत जन्मानंतर मुलीच्या नावावर 5000/- रुपये जमा होतील. तसेच यानंतर इयत्ता 4 थी मध्ये मुलगी गेल्यावर 4000/- रुपये, आणि इयत्ता 6वी मध्ये मुलगी गेल्यावर 6000/- रुपये आणि 11वी मध्ये गेल्यावर मुलीच्या बँक खात्यात 8000/- रुपये शासनाव्दारे जमा करण्यात येतील . त्याचप्रमाणे लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येणार आहे
अर्ज करण्याची पद्धतलवकरच अपडेट
श्रेणीराज्य सरकारी योजना
वर्ष2023

काय आहे लेक लाडकी योजना महाराष्ट्र?

लेक लाडकी योजना 2023 लाँच करण्याची घोषणा अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी विधानसभेतील अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिवारात जन्म घेतलेल्या मुलींना लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत पाच हप्त्यांमध्ये शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. त्यामुळे या आर्थिक मदतीची रक्कम मिळाल्यानंतर राज्यातील मुलींच्या शिक्षणाच्या सबंधित कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. त्यामुळे समाजातील मुलींबद्दलची नकारात्मक विचारसरणी बदलण्यात मदत होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *