Politics

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र जेजुरी जेजुरी गड विकास आराखड्याच्या ३४९ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ३ टप्प्यांमध्ये हा आराखडा राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गडकोटातील मुख्य मंदिर, इतर छोटी मंदिरे, ओवऱ्या आणि तटबंदीचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहेत. तसेच मुख्य गडकोट व कडे पठार परिसरातील १५४ दीपमाळांची जतन व दुरुस्ती, १ हजार ३११ पायऱ्या आणि १५ कमानींची जतन व दुरुस्ती, कडे पठार येथील खंडोबाचे मुख्य मंदिर, परिसरातील इतर ८ मंदिरे व कमान, ओवऱ्यांचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र जेजुरी जेजुरी गड विकास आराखड्याच्या ३४९ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ३ टप्प्यांमध्ये हा आराखडा राबविण्यात येणार आहे.

 

पहिल्या टप्प्यात गडकोटातील मुख्य मंदिर, इतर छोटी मंदिरे, ओवऱ्या आणि तटबंदीचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहेत. तसेच मुख्य गडकोट व कडे पठार परिसरातील १५४ दीपमाळांची जतन व दुरुस्ती, १ हजार ३११ पायऱ्या आणि १५ कमानींची जतन व दुरुस्ती, कडे पठार येथील खंडोबाचे मुख्य मंदिर, परिसरातील इतर ८ मंदिरे व कमान, ओवऱ्यांचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते

#.#chaufervartanews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *