शेतकरी मित्र

विद्राव्य खतांच्या वापरासाठी फायदेशीर फर्टिगेशन तंत्रज्ञान

पाण्यात विरघळणारी खतेठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन द्वारे पिकांच्या मुळाजवळ गरजेनुसार परंतु रोज किंवा १-२ दिवसाआड देणे याला फर्टिगेशन असे म्हणतात. फर्टिगेशनमुळे मोजकीच खते पिकांच्या मुळांना मिळतात. खतांचा प्रभावी वापर होतो व अपव्यय टळतो.

फर्टिगेशनचे फायदे 
१) झाडाची वाढ चांगली होते. पिकांना पाणी आणि अन्नद्रव्याचा नियमित पुरवठा होत असल्यामुळे उत्पादन वाढते.
२) फळाची गुणवत्ता वाढते. विद्राव्य खत वापरल्यामुळे खताची बचत होते.
३) पारंपरिक रासायनिक खते पाण्यात संपूर्णपणे विरघळत नाहीत. परंतु हि खते पाण्यात संपूर्णपणे (१००%) विरघळतात त्यामुळे पिकांना ती लवकर उपलब्ध होतात.
४) पारंपरिक खतांमध्ये क्लोराईड व सोडियम सारखी हानिकारक मूलद्रव्ये असतात. त्यामुळे उत्पादन व फळाची प्रत कमी होते. तसेच या क्षारामुळे जमिनी खारवट व चोपणट होतात.
५) पारंपरिक खते मोठ्या प्रमाणात विकत घ्यावी लागतात. त्यांचा वाहतुकीचा खर्च खूपच जास्त असून. वाहतूक करणेही जिकरीचे काम असते. परंतु पाण्यात विरघळणारी खते हि अगदी कमी प्रमाणात घ्यावी लागतात. त्यामुळे वाहतुकीचा खर्च अगदी कमी असून वाहतूक करणे हि अगदी सोपे असते.
६) आम्लधर्मीय खतांचा पाण्यात नियमितपणे ठिबक मधून वापर करावा. त्यामुळे जमिनीचा सामू नियंत्रित राहण्यास मदत होते.
७) वाढीच्या प्रत्येक अवस्थेत वेगवेगळ्या अन्न घटकांची आवशकता त्याचे व्यवस्थापन आपण केवळ फर्टिगेशन तंत्रामधूनच करू शकतो.
८) पारंपरिक रासायनिक खतामधील अन्नद्रव्ये झाडांना त्वरीत उपलब्ध होत नाहीत. परंतु या खतामधील अन्नद्रव्ये झाडांना त्वरित उपलब्ध होतात.
९) पाण्याचा होणारा निचरा, बाष्पीभवन, स्थिरीकरण इ. कारणामुळे पारंपरिक रासायनिक खते झाडांना अगदी कमी प्रमाणात उपलब्ध होतात व बाकीची वाया जातात.
१०) बहुतेक पारंपरिक खते पाण्यात विरघळत नसल्यामुळे ती ठिबक संचातून आगर तुषार सिंचनातून देता येत नाहीत.
११) पारंपरिक खते फार तर दोन किंवा चार भागात विभागून देतात परंतु विद्राव्य खते पिकांच्या गरजेनुसार व अवस्थेनुसार अगदी नियमित देता येतात.
१२) विद्राव्य खते थेट पिकांच्या मुळ्याच्या कक्षेत दिली जातात.
१३) विद्राव्य खते आम्लधर्मीय असल्यामुळे ठिबक सिंचन संचात अगर तुषार सिंचन संचात क्षार साचत नाहीत. ड्रीपर किंवा नोझल चॉक होत नाहीत.
१४) विविध विद्राव्य खते एकमेकांमध्ये मिसळता येण्यास योग्य असतात.
१५) एकाच द्रावणातून नत्र, स्फुरद व पालाश हि तीनही अन्नद्रव्ये देता येतात.
१६) विद्राव्य खताच्या वापरामुळे हलक्या जमिनीतूनही अधिक उत्पादन मिळणे शक्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *