क्रिकेट खेळ

आम्ही चौथ्याच दिवशी सामना जिंकला असत, पण… रोहित शर्मा असं का म्हणाला जाणून घ्या…

भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना पाचव्या दिवसावर गेला. पाचव्या दिवशी पाऊस पडला आणि त्यामळे हा सामना अनिर्णीत राहीला. त्यामुळे भारताला तोंडाशी आटलेला विजयाचा घास घेता आला नाही. पण पाचव्या दिवसावर हा खेळच गेला नसता आणि भारतीय संघाने चौथ्या दिवशीच सामना जिंकला असता, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले आहे. पण चौथ्या दिवशी असं नेमकं भारतीय संघाकडून घडलं तरी काय, जाणून घेऊया…

सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने टी-२० स्टाइलमध्ये फलंदाजी केली होती. यावेळी भारतीय संघाने २४ षटकांत १८१ धावा फटकावल्या होत्या. भारातकडून रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन यांनी धडेकाबाज फलंदाजी केली होती. भारतीय संघाने यावेळी एवढ्या जलदगतीने धावा केल्या कारण, त्यांना हा सामान चौथ्याच दिवशी संपवायचा होता. त्यानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडिजपुढे ३६५ धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचबरोबर ३२ षटकांचा खेळ शिल्लक होता. त्यामुळे चौथ्या दिवशी सामना जिंकण्याचे भारताने ठरवले होते.

याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, ” सामन्याच्या चौथ्या दिवशी आम्ही सकारात्मकपणे मैदानात उतरलो होतो. कारण हा सामना आम्हाला चौथ्याच दिवशी जिंकायचा होता.” पण यावेळी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारातचे हे स्वप्न धुळीस मिळवले होते. कारण वेस्ट इंडिज या ३२ षटकांत फक्त दोनच विकेट्स गमावले होते. त्यामुळे भारताला चौथ्या दिवशी हा सामना जिंकता आला नाही आणि भारताला पाचव्या दिवशी विजयासाठी आठ विकेट्सची गरज होती. पण पावसामुळे पाचव्या दिवशीचा खेळ झाला नाही आणि सामना अनिर्णीत राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *