गुन्हा

८६ लाखांचे ८ किलो ७५० ग्रॅम चरस अंमली पदार्थ जप्त; ३ आरोपींना अटक

नालासोपारा :- गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी ८६ लाख १३ हजार रुपयांचे तब्बल ८ किलो ७५० ग्रॅम चरस अंमली पदार्थ जप्त करण्यात यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून यांनी हा साठा कुठून आणला व यामागे कोणी साथीदार आहेत का याचा गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस […]

गडचिरोली गुन्हा

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने नक्षल्यांकडून आणखी एका तरुणाची हत्या

गडचिरोली: जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हत्यासत्र काही केल्या थांबायला तयार नाही. दक्षिण गडचिरोलीत तीन तरुणांची हत्या केल्यानंतर आता नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा  उत्तर गडचिरोलीकडे  वळवला आहे. २ डिसेंबरच्या रात्री पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने एका तरुणाची गळा आवळून हत्या करत पत्रक सोडण्यात आले. मत तरुण एकेकाळी नक्षल्यांसाठीच काम करत होता हे विशेष. सध्या नक्षलवाद्यांचा ‘पीएलजीए’ सप्ताह सुरु आहे. पहिल्या दिवशी भामरागड तालुक्यात बॅनर व […]

गुन्हा

कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअर बनला किडनॅपर, पत्नी-लेकीसह मिळून केलं चिमुकलीचं अपहरण

केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जात बुडालेला एक इंजिनिअर, त्याची पत्नी आणि यूट्यूबर मुलीला अटक करण्यात आली आहे. यांनी 10 लाखांच्या खंडणीसाठी सहा वर्षांच्या मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगल्यानंतर त्यांनी अपहरण केलेल्या मुलीला कोल्लम येथील सार्वजनिक मैदानात सोडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पद्मकुमार (52), […]

गुन्हा मुंबई

मुंबई : अंधेरी, डोंगरी व जोगेश्वरीतून १२ लाखांचे एमडी जप्त, चार जणांना अटक

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) विशेष मोहिमेदरम्यान अंधेरी, डोंगरी व जोगेश्वरी या परिसरात सर्च ऑपरेशन करत चौकडीला बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून १२ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. एएनसीचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे, कांदिवली कक्षाने ही कारवाई केली आहे. यामध्ये अंधेरी, डोंगरीत कारवाई दरम्यान दोघे जण मिळून एमडीसह मिळून […]

गुन्हा सांगली

सांगली : मेलेल्या सवतीची करणी काढण्यासाठी अघोरी उपाय, कारंदवाडीच्या ‘शेंबडेमामा’चा भांडाफोड

आष्टा : मेलेल्या सवतीने केलेली करणी काढण्यासाठी अघोरी उपाय करणाऱ्या कारंदवाडीच्या प्रकाश विष्णू शेंबडे पाटील उर्फ मामा याचा भांडाफोड अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली आणि आष्टा पोलिसांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ करून केला. त्याच्याविरुद्ध आष्टा पोलिसांनी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध’ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आष्टा पोलिस व अंनिसने दिलेली माहिती अशी, प्रकाश शेंबडे पाटील उर्फ […]

गुन्हा

कोल्हापुरातील शेअर ट्रेडिंग कंपनीकडून गुंतवणूकदारांना कोटीचा गंडा; सहा संशयितांवर गुन्हा

ताराबाई पार्क येथील फॉरेक्स वेल्थ शेअर ट्रेडिंग कंपनीने गुंतवणूकदारांची एक कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत संजय सॅलो कास्टो (वय ५७, रा. हल्याळ, जि. कारवार, कर्नाटक) यांनी रविवारी (दि. ३) रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फॉरेक्स वेल्थ सोल्युशन कंपनीसह सहा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फॉरेक्स वेल्थ सोल्युशन (स्वानंद कॉम्प्लेक्स, ताराबाई पार्क, कोल्हापूर) […]

गुन्हा

मैत्रीत्व दिनीच केला मित्राचा सुरा भोसकून खून

एके वेळेचे मित्र, मात्र त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाल्यानंतर रविवारी (दि.६) नवेवाडे येथे राहणाºया मेहबूब शेख आणि अँथनी फर्नांडीस या तरुणात भांडण निर्माण झाल्यानंतर अँथनीने मेहबूबच्या छातीत सुरा भोसकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नवेवाडे येथील एकाच चाळीत (हाऊझींग बोर्ड कॉलनी) राहणाºया मेहबूब अणि अँथनी यांच्यात काही वर्षापूर्वी वैमनस्य निर्माण झाल्यानंतर त्यांच्यात अनेकवेळा मारामारी, बाचाबाची असे प्रकार […]