राजकारण

#शिंदेंचा_ठाकरेंना_आणखीन_एक_धक्का..! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विक्रोळी टागोर नगर विभागाचे शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

#शिंदेंचा_ठाकरेंना_आणखीन_एक_धक्का..!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विक्रोळी टागोर नगर विभागाचे शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या धारावी येथील माजी नगरसेविका रेश्मा बानो वकील शेख आणि जोगेश्वरी येथील माजी नगरसेविका

नाजिया सोफिया यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक तसेच राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राज्य शासनाच्या वतीने आपल्या प्रभागातील सर्व प्रलंबित प्रश्न नक्की मार्गी लावण्यात येतील असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार मनीषा कायंदे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे,शिवसेना उपनेत्या कला शिंदे हे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *