छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात दिली ३ हजार ४६२ कुणबी जात प्रमाणपत्रे; २ कोटी कागदपत्रांत शोधले आणखी पुरावे

मराठवाड्यात ३ हजार ४६२ कुणबी जात प्रमाणपत्र १ नोव्हेंबरपासून आजवर देण्यात आली आहेत. आठ जिल्ह्यांच्या महसूल यंत्रणेने आजवर २ कोटी पुराव्यात शोधलेल्या सुमारे २७ हजार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या पुराव्यांच्या आधारे विभागातील सुमारे साडेपाच लाख जणांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळू शकेल, असा दावा विभागीय प्रशासन करीत आहे. एका पुराव्याच्या आधारे सुमारे २० जणांना वंशावळप्रमाणे प्रमाणपत्र मिळू […]

छत्रपती संभाजीनगर

बोगद्यातून ४१ कामगारांची सुटका करणाऱ्या देवदूतांचा छत्रपती संभाजीनगरात होणार सत्कार

उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढणाऱ्या एनडीएफचे जवान व कामगारांचा सत्कार छत्रपती संभाजीनगर शहरात करण्यात येणार आहे. अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लीम इंडियन ओरिजिन अमेरिका अँड कॅनडा या आंतरराष्ट्रीय संस्थेची ३० व ३१ डिसेंबर रोजी पहिल्यांदाच शैक्षणिक परिषद होत असून त्यात या देवदूतांचा व देशभरातील ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे.  यासंदर्भात परिषदेचे […]

छत्रपती संभाजीनगर

विद्यापीठाचा आर्थिक अन् प्रशासकीय गाडा रुळावर आणल्याचा आनंद

साडेचार वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासन आणि आर्थिक पातळीवर गाडा रुळावर आणण्याची गरज होती. त्यास यश मिळाले. मागील वर्षी विद्यापीठाचे बजेट ३५ कोटी रुपये शिलकीत राहिले. याच काळात तीन वेळा ॲट्रॉसिटीची तक्रार, दोन वेळा विधिमंडळात हक्कभंग आणण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. कुलगुरू डॉ. […]